माई टीव्हीएसचा दुबईमध्ये गौरव

My TVS celebrated in Dubai
By surekha - 8/22/2023 4:15:56 PM
Share This News:

माई टीव्हीएसचा दुबईमध्ये गौरव..

टीव्हीएस मोटर इंडिया लिमिटेड तर्फे दुबई येथे संपूर्ण भारतातील टीव्हीएस डीलर्स करिता आयोजित सन्मान सोहळ्यात आपल्या कोल्हापूरच्या माई टीव्हीएसला "सर्व्हिस इनफ्लो" मध्ये संपुर्ण भारतामध्ये ३ ऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात इलेक्ट्रिक स्कूटर आय क्यूबचे भारतातील सर्वाधिक गाड्या विकणारी डीलरशिप म्हणूनही माई टीव्हीएसला गौरवण्यात आलं.  टीव्हीएस मोटर्सचे डायरेक्टर के. एन. राधाकृष्णन यांच्या हस्ते माई टीव्हीएसचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी हे  पुरस्कार स्वीकारले. 

माई टीव्हीएस नेहमीच ग्राहकांना उत्तम सर्व्हिस प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील असते. कस्टमरला वेळोवेळी सर्व्हिस रिमाइंडर पाठवणे, शक्य तितक्या लवकर वाहनाची सर्व्हिस करून देणे, सर्व्हिस करिता निरनिराळे कॅम्पस तसेच व्हेईकल पिक अप अँड ड्रॉप सारख्या सुविधांच्या जोरावर माई टीव्हीएसने ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. शिवाय तरुण वर्गामध्ये इलेक्ट्रिक स्कुटर अधिक लोकप्रिय झाली आहे. आज सर्वाधिक विश्वसनीय स्कुटर म्हणून टीव्हीएस आय क्यूब ग्राहकांच्या मनात घर करून राहिली आहे. माई टीव्हीएस काळाची पावले ओळखून आपल्या ग्राहकांना उत्तम सर्व्हीस देत आहे, त्यामुळेच हे पुरस्कार प्राप्त झाले असे प्रतिपादन तेज घाटगे यांनी केलं आहे. 

यानिमित्ताने माई टीव्हीएस चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तेज घाटगे यांनी ग्राहकांचे आभार व्यक्त केले तसेच भविष्यात माई टीव्हीएस ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.