कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा कहर; श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी प्रशासनाची चिंता वाढली पाच महिन्यांत ३४ हजार श्वानदंशाच्या घटना; लसीकरण आणि निर्बिजीकरणासाठी १८ कोटींच्या निधीची गरज कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. शहरासह ग्रामीण भागात श्वानदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, या परिस्थितीमुळे प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे १४ हजार श्वानदंशाच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षातील केवळ पहिल्या पाच महिन्यांतच श्वानदंशाच्या घटनांचा आकडा तब्बल ३४ हजारांवर पोहोचला आहे. अचानक झालेली ही वाढ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी १८ कोटींची आवश्यकता भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार या संपूर्ण मोहिमेसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमा