बातम्या

आजऱ्यात विठू माऊली वारकरी मंडळ मुळगावचे भक्तीभावाने स्वागत*

Ajra Vithu mauli


By nisha patil - 7/15/2026 11:18:14 PM
Share This News:



**आजऱ्यात विठू माऊली वारकरी मंडळ मुळगावचे भक्तीभावाने स्वागत*

**आजरा(हसन तकीलदार)*:-आजऱ्यात प्रथमच आजरा व्यापारी असोसिएशन तर्फे वारकरी मंडळाचे अगदी भक्तीभावात स्वागत करण्यात आले. संत परंपरेचा वारसा जपत भक्तीभावाने मार्गक्रमण करणाऱ्या विठू माऊली वारकरी मंडळ मुळगाव, डिचोली-गोवा दिंडीचे आजरा नगरीत आगमन झाले असता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश नार्वेकर यांच्या नेतृत्वात वारकरी व भाविकांचे मोठ्या उत्साहपूर्ण भक्तीभावात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर हॉटेल साईलीलाचे चालक ज्ञानेश्वर कुंभार यांनी आपल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून दिली.

     यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर म्हणाले की, वारकरी मंडळी उन, वारा आणि पाऊस यांची तमा न बाळगता भक्तीभावाने पायी वारी करीत आहेत. यामध्ये विठ्ठलभक्त माता भगिनींसुद्धा आहेत. त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यवस्था करीत आहोत. भविष्यात आम्हाला त्यांची पूर्ण सेवा करण्याची संधी या विठू माऊलीने द्यावी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. तसेच यांची ही पायी वारी सुखासमाधानाने होवो ही माऊली चरणी प्रार्थना करतो.

  विठू माऊली वारकरी मंडळाचे संतोष आरुळकर यांनी व्यापारी असोसिएशनचे मनापासून धन्यवाद मानले आणि म्हणाले की, मुळगाव डिचोली गोवा येथून तीन दिवस झाले प्रस्थान करून आज आमचे आजऱ्यात आगमन झाले आहे. हॉटेल साईलीला यांनी राहण्याची सोय करून व्यापारी संघटनेने एव्हढी शिधा, औषधे साहित्य देऊन आम्हाला आशीर्वाद दिला. विठू माऊली त्यांचे आरोग्य चांगले ठेवो आणि त्यांची भरभराट करो अशी प्रार्थना करतो.

    यावेळी संजय हरेर, सचिन इंदुलकर, मल्लिकार्जुन तेरणी, मनोज गुंजाटी, बाळू पाचवडेकर, अभी इंजल, राजू विभुते,गौरव देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, विनायक अमनगी, सतीश कुरुणकर, सुभाष पारपोलकर, गुरु सुतार, भास्कर बुरुड,दाऊद लमतुरे यांच्याबरोबरच विठू माऊली वारकरी मंडळाचे महादेव तेरुडकर, मेघनाथ कोळे, बनमाली कोरणे नरेश बुगडे यांच्यासह विठू माऊली वारकरी मंडळाचे वारकरी माता भगिनी उपस्थित होत्या.


आजऱ्यात विठू माऊली वारकरी मंडळ मुळगावचे भक्तीभावाने स्वागत*
Total Views: 88