बातम्या
खेड रेल्वे स्थानकावर मंत्री आशिष शेलार यांचे आगळेवेगळे स्वागत; लोककलांनी वेधले लक्ष.
By nisha patil - 7/15/2026 1:11:25 PM
Share This News:
खेड रेल्वे स्थानकावर मंत्री आशिष शेलार यांचे आगळेवेगळे स्वागत; लोककलांनी वेधले लक्ष.
रत्नागिरी ' : गवस शुभम राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आज रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खेड रेल्वे स्थानकावर त्यांचे पारंपरिक आणि अनोख्या पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंत्री शेलार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांनी लोककलेचे सादरीकरण करत वातावरण उत्साहपूर्ण केले. या अनोख्या स्वागताची उपस्थितांकडून विशेष दखल घेण्यात आली.
मंत्री आशिष शेलार यांच्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
खेड रेल्वे स्थानकावर मंत्री आशिष शेलार यांचे आगळेवेगळे स्वागत; लोककलांनी वेधले लक्ष.
|