बातम्या

व्यायामाचे महत्त्व समजावे म्हणून मी जिम मध्ये: समरजीत सिंह घाटगे

I hit the gym to understand the importance of exercis Samarjit Singh Ghatge


By nisha patil - 6/17/2024 8:26:44 PM
Share This News:आजच्या धक्का -  धक्कीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती  अत्यंत महत्त्वाची असून हाच शरीराचा इन्शुरन्स आहे.युवा पिढीकडून मोबाईल व सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.त्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्याने कमी वयात तरुणांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.हे टाळण्यासाठी युवा पिढीने शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे त्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल रींगरोड येथे गोल्डन ईरा जीममध्ये त्यांनी स्वतः व्यायाम केला.त्यानंतर ते येथील व्यायामपटूशी  संवाद साधताना बोलत होते.
घाटगे यांनी चाळीस मिनिटांच्या वर्क आऊटमध्ये एक्सरसाईज जीममधील तरुणांसमवेत करुन त्यांना प्रोत्साहित केले.


व्यायामाचे महत्त्व समजावे म्हणून मी जिम मध्ये: समरजीत सिंह घाटगे