बातम्या

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन 

gandhi jayanti celebration


By Administrator - 2/10/2023 12:07:45 PM
Share This News:शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमापूजन 

कोल्हापूर, 
-शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.  याप्रसंगी, विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त सामूहिक शपथही घेण्यात आली.  


यावेळी अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.जगदीश सपकाळे, गांधी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.प्रकाश पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, डॉ.रविंद्र भंणगे, डॉ.सुखदेव उंदरे,   डॉ.नेहा वाडकर, डॉ.जयश्री कांबळे, दौलत नांद्रे यांचेसह संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

 


शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन