आईने पोटच्या लेकराचाच केला खून, तब्बल सात जणांची घेतली मदत; रायबागमधील खुनात कोल्हापुरातील आरोपीं    

The mother killed her baby took the help of as many as seven people Accused from Kolhapur in Raibag murder


By surekha - 6/23/2023 4:14:20 PM
Share This News:आईने पोटच्या लेकराचाच केला खून, तब्बल सात जणांची घेतली मदत; रायबागमधील खुनात कोल्हापुरातील आरोपीं                                    अनैतिक संबंध लपवण्यासाठी पोटच्या लेकराचा खून करुन नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवणाऱ्या प्रकरणाचा रायबाग पोलिसांनी उलगडा केला आहे. तब्बल महिन्याभरानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. जन्मदात्या आईनेच नात्यातील तब्बल सात जणांची मदत घेऊन लेकराचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी ,आईसह तिघांना अटक करण्यात आली असून चौघे फरार आहेत. अटकेतील आरोपींमध्ये कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील शिंगणापूरमधील एकाचा समावेश आहे. हरिप्रसाद संतोष भोसले असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. रायबाग पोलिसांनी खुनी आई सुधा उर्फ माधवी संतोष भोसले हिच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. रायबागमध्ये संतोष भोसले हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. सुधाचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मुलगा हरिप्रसादला समजली होती. त्यामुळे अनैतिक संबंधांचा उलगडा होऊ नये, यासाठी थेट मुलालाच संपवण्याचा कट आईने रचला.
आईने पोटच्या मुलाचा खून करण्यासाठी वैशाली सुनील माने, गौतम सुनील माने यांच्या मदतीने मुलगा हरिप्रसादचा गेल्या महिन्यात 28 मे रोजी खून केला. खून केल्यानंतर मुलगा झोपलेल्या जागेवरुन उठत नसल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. हरिप्रसादच्या अचानक मृत्यूने सर्वांनाच हादरा बसला. बाहेरगावी गेलेल्या वडिलांनाही या घटनेमुळे प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. परत आल्यानंतर मुलाचा मृत्यू संशयास्पद जाणवला. मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी रायबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 
वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत महिन्याभरात खुनाचा छडा लावला. मुलाच्या खुनात आईने नात्यातील सात जणांची मदत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.


The mother killed her baby took the hp of as many as seven people; Accused from Kolhapur in Raibag murder