बातम्या
बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हन्नूरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, मर्दानी खेळ साहित्य व पुस्तकांचे वाटप
By nisha patil - 7/15/2026 3:33:34 PM
Share This News:
बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हन्नूरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, मर्दानी खेळ साहित्य व पुस्तकांचे वाटप
*व्हन्नूर (प्रतिनिधी) :** विद्या मंदिर, व्हन्नूर येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित करण्यात आलेल्या वह्या, मर्दानी खेळाचे साहित्य आणि अध्यात्मिक पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड, संस्कार आणि पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, कागल तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष रणजीत पाटील, उपाध्यक्ष अनिल संकपाळ, सरचिटणीस राहुल घराळ, सरपंच पूजा मोरे, उपसरपंच मंगल कोकणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बोराटे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसो माने, मुख्याध्यापक संजय दाभाडे, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात अनिल संकपाळ यांनी व्हन्नूर गावाला लाभलेल्या तीन समाजसुधारकांच्या कार्याचा गौरव केला. शाहीर बाळाराम संकपाळ यांनी शाहिरी, लेझीम, दांडपट्टा आणि कुस्तीच्या माध्यमातून समाजसेवा व संस्कृती जपली, स्वर्गीय दौलतराव निकम यांनी शिक्षणाचा पाया मजबूत केला, तर ह.भ.प. लवाटे गुरुजी यांनी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सागर कोंडेकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि चांगले नागरिक बनण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापक संजय दाभाडे यांनी शाळेसाठी वह्या, क्रीडा साहित्य आणि पुस्तकांचे वितरण केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
**– तारा न्यूज प्रतिनिधी, अजित बोडके**
बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हन्नूरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, मर्दानी खेळ साहित्य व पुस्तकांचे वाटप
|