विशेष बातम्या

टोळक्याकडून तरुणीची भर रस्त्यात छेडछाड

Young girl molested on the street by the gang


By nisha patil -
Share This News:गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडालेले आहेत. ना कुणाला कायद्याची भीती आहे ना पोलिसांच्या कारवाईची. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना शहरात समोर आली आहे. एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर धर्माच्या मुलासोबत फिरते या संशयावरुन तरुणांच्या टोळक्याने मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास दिला. या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला. मात्र मुलीने आणि घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलिसांकडून सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे . छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी आपल्या एका मित्रासोबतल बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी आली होती. मात्र एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर समाजाच्या मुलासोबत फिरत असल्याचे म्हणत, तरुणांचं टोळकं तिथे जमा झालं. यावेळी त्यांना पाहून मुलाने तिथून पळ काढला. मात्र उपस्थित असलेल्या मुलीला या टोळक्याने घेरलं. तिला शिवीगाळ करु लागले, कोणी तिचा स्कार्फ ओढत होता, तर कोणी तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. मुलगी जोरजोरात ओरडत होती. मला सोडा अशी विनवणी करत होती. पण जातीचं भूत डोक्यात घुसलेल्या या टोळक्याला कसलाही फरक पडत नव्हता. दरम्यान या सर्व घटनेनंतर मुलीने आणि तिच्या घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पोलिसांकडून सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.


Young girl molested on the street by the gang