बातम्या

सबजेल बिंदू चौकातून पळून गेलेल्या आरोपीला शाहूपुरी पोलिसानी केले अटक 

accused arrested by shahupuri police


By Administrator - 10/28/2023 5:42:45 PM
Share This News:२४ तासात पळून गेलेला आरोपी जेरबंद

सबजेल बिंदू चौकातून पळून गेलेल्या आरोपीला शाहूपुरी पोलिसानी केले अटक 

सबजेल बिंदु चौक कोल्हापूर येथून दि. 27/10/2023 रोजी धनराज कुमार  बिहारचा असून तो अटकेत असताना  पळुन गेला होता. पोलीस अधिक्षक  महेद्र पंडीत व उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांचेकडून  आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना मिळाल्या होत्या.

 आरोपी याचा शोध घेत असताना, आज  संजय जाधव, मिलींद बांगर, लखनसिंह पाटील व शुभम संकपाळ यांना त्यांचे गोपणीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की सबजेल बिंदु चौक कोल्हापूर येथुन पळुन गेलेला आरोपी हा बागल चौक येथे आहे त्याप्रमाणे त्या  ठिकाणी सापळा रचून  आरोपीचा शोध घेतला असताना  बागल चौक येथे हा आरोपी  संशयीत रित्या डोक्याला टोपी तोंडाला माक्स लावुन फिरत होता . त्यास थांबवुन त्याचा तोंडाचा मास्क काढण्यास सांगीतले असता तो पळुन जाण्याचा प्रयत्नात होता ,तोंडाचा मास्क काढला असता तो सबजेल बिंदु चौक कोल्हापूर येथून पळुन गेला आरोपी धनराज कुमार हा असलेचे खात्री झालीने त्याला  ताब्यात घेणेत आले 

सदर कारवाई  पोलीस अधिक्षक  महेद्र पंडीत व उप विभागीय पोलीस अधिकारी अजीत टिके यांचे सुचनेप्रमाणे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर व सत्यवान हाक्के यांचे मार्गदशनाखाली ,पी.एस.आय प्रमोद चव्हाण, सहा. फौजदार संदिप जाधव, पोलीस अंमलदार मिलीद बांगर, विकास चौगुले शुभम संकपाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, रवी अंबेकर, महेश पाटील यांनी केली आहे.


सबजेल बिंदू चौकातून पळून गेलेल्या आरोपीला शाहूपुरी पोलिसानी केले अटक