बातम्या

बी आर एस पक्ष नेते संजय पाटील यांनी खरीप पिकांच्या संयुक्त पिक पाहणीची अधिसूचना तातडीने काढण्याची केली मागणी

pik vima


By Administrator - 8/22/2023 4:16:19 PM
Share This News:



बी आर एस पक्ष नेते संजय पाटील यांनी खरीप पिकांच्या संयुक्त पिक पाहणीची अधिसूचना तातडीने काढण्याची केली  मागणी

पिकांचे  पंचनामे तातडीने  करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढावे यासाठी धरला  आग्रह 

जिल्हाधिकारी राहुल रेखावर व जिल्हा अधीक्षक कृषी कोल्हापूर दत्तात्रय दिवेकर   यांना दिले निवेदन 

कोल्हापूर 

ऑगस्ट महिन्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे


 पाऊस न पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस,मका ,बाजरी ,ज्वारी तांदूळ तूर सोयाबीन इ खरीप पिके धोक्यात आहेत 

ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे  परिणामी उत्पादनात मोठी घट येणार आहे.

किमान 21 दिवसांचा खंड पडला तर विमा कंपनीस नुकसान भरपाई देण्याची जोखीम विमा कंपनीने पीक विमा योजनेतून घेतलेली आहे 

पीक विमा योजनेत  चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनात गेल्या वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाईची 25% पर्यंत आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. 

विमा कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना आगाऊ 25% पर्यंत नुकसान भरपाई देण्याबाबत निश्चित करण्याचे पत्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी काढले आहे .

त्यामुळे आता संयुक्त पीक पाहणीची अधिसूचना जिल्हाधिकारी या नात्याने करून  ती तातडीने काढावी व जिल्हयातील शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बीआरएस पक्षाच्या वतीने केली आहे अन्यथा आम्ही  आंदोलन करू  असा इशारा बी आर एस पक्षाचे वतीने दिलेल्या निवेदनात केला आहे 


 त्यामुळे तातडीने खरीप पिकांचे  पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश काढावे अशी मागणी करून निवेदन दिले आहे यावेळी 

बी आर एस पक्ष नेते श्री संजय पाटील  , जिल्हा समन्वयक तोहिद बक्षू, संग्राम जाधव, विक्रम जरग, भीमराव पाटील, साकेतराज देशमुख ,सतीश मोटे, प्रकाश पाटील ,संदीप वाडकर, तानाजी मोरे, रोहित जाधव, महेश परीट हजर होते 
 


बी आर एस पक्ष नेते संजय पाटील यांनी खरीप पिकांच्या संयुक्त पिक पाहणीची अधिसूचना तातडीने काढण्याची केली मागणी