बातम्या

लोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

122 complaint applications filed on Lokshahi Din


By Administrator - 2/3/2026 4:42:20 PM
Share This News:



लोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण १२२ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित ३८ अर्जांचा समावेश आहे. महसूल शाखेंतर्गत करवीर तहसील कार्यालयाकडे ५, पन्हाळा तहसील कार्यालयाकडे ११, तर इतर महसूल कार्यालयांकडे २२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

इतर शासकीय विभागांकडे एकूण ८४ अर्ज प्राप्त झाले असून , त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित सर्वाधिक १९ अर्जांची नोंद झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे १८, भूमी अभिलेख विभागाकडे १०, इचलकरंजी महानगरपालिकेकडे ८, एमएसईबीकडे ८ आणि कोल्हापूर महानगरपालिकेकडे ७ अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित इतर विभागांकडे १४ अर्ज दाखल झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमारे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


लोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Total Views: 13