बातम्या
जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली
By nisha patil - 5/28/2025 4:44:25 PM
Share This News:
जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणात 4.18 टीएमसी पाणीसाठा
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे संततधार सुरू आहे. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणात 4.18 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.
तर पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील*- हळदी, सरकारी कोगे, दूधगंगा नदीवरील - दत्तवाड, सिध्दनेर्ली, बाचणी असे एकूण 13 बंधारे पाण्याखाली आहे.
जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली
|