बातम्या
भव्य मोर्चा व धरणे आंदोलन 21 जुलै 2026 रोजी
By nisha patil - 7/19/2026 8:40:19 PM
Share This News:
*अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र व अखिल भारतीय गुरव समाज संघटना आयोजित देवस्थान इनाम जमीन धारक देवस्थान पुजारी व शेतकऱ्यांचा भव्य यलगार*
भव्य मोर्चा व धरणे आंदोलन 21 जुलै 2026 रोजी*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आझाद मैदान मुंबई येथे होत असलेल्या या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी भागातून देखील हजारो शेतकरी सामील होणार आहेत. देवस्थान जमीन धारक सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा सामील व्हावे असे आवाहन कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी केले आहे. "देवस्थान इनाम खालसा झालंच पाहिजे...,
कायदा त्वरित अमलात आला पाहिजे"या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे.सरकार सकारात्मक आहे. दिनांक २१ जुलै २०२६ रोजी या आंदोलनात सर्व देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करावे याकरिता चलो *आझाद मैदान -मुंबई* चे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.
भव्य मोर्चा व धरणे आंदोलन 21 जुलै 2026 रोजी
|