बातम्या
आजरा तालुका समूहगीत गायन स्पर्धेत उर्दू प्राथमिक शाळेचे दैदीप्यमान यश*
By nisha patil - 8/19/2026 1:59:15 PM
Share This News:
**आजरा तालुका समूहगीत गायन स्पर्धेत उर्दू प्राथमिक शाळेचे दैदीप्यमान यश*
**आजरा(हसन तकीलदार)*:-श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे भरतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य आयोजित शालेय समूहगीत गायन स्पर्धेमध्ये पीएमश्री उर्दू प्राथमिक विद्यामंदिर आजरा यांनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
आजरा तालुका समूह गीत गायन स्पर्धेत इयत्ता 1 ली ते 10 वी असा एकच गट असलेल्या या स्पर्धेमध्ये आजरा तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. चूरशीच्या स्पर्धेत पी एम श्री उर्दू विद्या मंदिरच्या इयत्ता 4 थी व 5 वी च्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपल्या सुरेल आवाजाने, आत्मविश्वासाने आणि सुरेख सादरीकरण करून तृतीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे नाव शिल्डवर कोरले. "बनायेंगे भारत को सुजलाम सुफलाम "हे गीत सादर करण्यात आले. यामध्ये निदा बेपारी, बरीरा खेडेकर, जिया इम्रान लमतुरे, सारा नेसरीकर, सारा लाडजी, सिदरा मुराद, मंतशा महागोंडे, कुबरा माणगावकर, फिजा लमतुरे, आफिफा शेख या विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. तर युनूस लाडजी, मिनाज नदाफ यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.
आजरा तालुका समूहगीत गायन स्पर्धेत उर्दू प्राथमिक शाळेचे दैदीप्यमान यश*
|