बातम्या

भावनिक आणि अनोख्या वातावरणात रोझरीत पालक सन्मान दिन साजरा*

331


By nisha patil - 7/28/2026 10:55:45 PM
Share This News:



**भावनिक आणि अनोख्या वातावरणात रोझरीत पालक सन्मान दिन साजरा*

**आजरा(हसन तकीलदार)*:-25 जुलै हा दिवस रोझरी इंग्लिश स्कुल मध्ये पालक सन्मान दिन म्हणून साजरा केला जात असून या विशेष दिनातून विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या पालकांविषयी कृतज्ञता व आदराची भावना वाढीस लागावी तसेच संस्काराची वाढ व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मुलांच्या जीवनात पालकांचे असलेले स्थान, त्यांचे महत्व आणि कुटुंबातील त्यांची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

अगदी भावनिक आणि अनोख्या पद्धतीने हा पालक सन्मान दिन साजरा करण्यात आला आणि तो सार्थकी लागल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई उपस्थित होते. 

      या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून फादर वॉल्विन फर्नांडिस लाभले. यावेळी बोलताना ते म्हणाले की " विद्यार्थ्यांत संस्कार, मूल्ये आणि आदर निर्माण होण्यास पालकांची भूमिका मोठी असून यातूनच मुलांच्या भविष्याची जडण घडण होत असते."तसेच शाळा मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी "मातृदेवो भव:,पितृदेवो भव:, गुरु देवो भव: यांचे जीवनातील स्थान व्यक्त करत असताना उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले."

       या कार्यक्रमास पर्यवेक्षक विजय केसरकर , सर्व शिक्षक वृंद ,शाळा समिती सदस्य, पालक वर्ग या मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात विविध स्पर्धा,परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले व याची धुरा स्टीफन डिसोझा यांनी सांभाळली.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅनेजर मेल्विन पायस यांचे प्रोत्साहन लाभले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सांचीझ डिसोझा, सौ.शैलजा कांबळे यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन स्टीफन फर्नांडिस तर आभार सौ. सांचीझ डिसोझा यांनी केले.


भावनिक आणि अनोख्या वातावरणात रोझरीत पालक सन्मान दिन साजरा*
Total Views: 61