बातम्या
कै. वैष्णवीच्या जन्मदिवसानिमित्य रुग्णांना फळे व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*
By nisha patil - 7/28/2026 11:21:34 PM
Share This News:
**कै. वैष्णवीच्या जन्मदिवसानिमित्य रुग्णांना फळे व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*
*आजरा(हसन तकीलदार)*:-मागील तीन महिन्यापूर्वी भिंत पडून कु. वैष्णवी भोसले (वय 13)हिचा अपघाती मृत्यू झाला होता. घरातील अत्यंत लाडकी आणि कुटुंबातील एकुलती मुलगी होती. त्यामुळे सर्व नातेवाईकांचा तिच्यावर लळा होता. सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि आदराने वागणारी हसतमुख वैष्णवीच्या अचानक निघून जाण्याने घरच्यांच्यावर एक जबरदस्त आघात झाला. आजही तीला कुटुंबीय विसरू शकत नाहीत. वैष्णवीचे काका गौतम भोसले (नाभिक संघटना तालुका अध्यक्ष)यांची ती अत्यंत लाडकी होती.
कु. वैष्णवीचा आज जन्मदिवस. या जन्मदिवसानिमित्य गौतम भोसले यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली तसेच शासकीय वस्तीगृहातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपल्या भावना व्यक्त करताना वैष्णवीचे काका गौतम भोसले म्हणाले की, ज्यावेळी वैष्णवी जन्मली तो दिवस आम्हाला आनंदाचा दिवस होता. कारण आमच्या कुटुंबात पहिलीच मुलगी झाली होती.वैष्णवीचे जास्तीत जास्त दिवस या वासतिगृहातील विद्यार्थ्यांच्यासोबत गेले आहेत. आज मला आनंद नाही परंतु तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आज तुमच्या सोबत आहे. असे भावनिक उद्गार काढले.
यावेळी अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर (माजी उपनगराध्यक्ष ), सचिन भोसले, कुणाल भोसले, तौफिक आगा, तुफेल आगा, बाळासाहेब पाचवडेकर, मिलिंद गुरव, आर्यन भोसले, राजू म्हेत्रे, ताहीर लमतुरे तसेच स्वराज्य तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कै. वैष्णवीच्या जन्मदिवसानिमित्य रुग्णांना फळे व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*
|