बातम्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आजऱ्यात तिरडी मोर्चा*
By nisha patil - 8/19/2026 7:34:38 PM
Share This News:
**शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आजऱ्यात तिरडी मोर्चा*
आजरा(हसन तकीलदार)*:-अनेक नागरिकांची जुनी मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले आहेत. त्याचबरोबर ज्यांची जुनी वीज मीटर आहेत त्यांना चौपट पाचपट वीज बिले दिले जात आहेत व दुरुस्तीसाठी कार्यालयात गेले असता नवीन मीटर बसविलेशिवाय बिल दुरुस्त करून देणार नाही अशी महावितरणची दादागिरी सुरु आहे.
या दादागिरीला जाब विचारण्यासाठी आणि महावीतरणच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजरा तर्फे शुक्रवार दि. 21ऑगस्ट रोजी तिरडी मोर्चा आयोजित केला आहे. तेव्हा शुक्रवारी सकाळी 10:00 वाजता छत्रपती संभाजी चौकात तालुक्यातील सर्व नागरिकांनी जामावे असे आवाहन तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आजऱ्यात तिरडी मोर्चा*
|