बातम्या

सामाजिक शांततेला धोका ठरणाऱ्यांवर कारवाई; चौघांवर हद्दपारी आदेश

581


By nisha patil - 9/9/2026 10:55:02 PM
Share This News:



सामाजिक शांततेला धोका ठरणाऱ्यांवर कारवाई; चौघांवर हद्दपारी आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. ‘चिन्या मामा गँग’शी संबंधित चौघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

विजय उर्फ चिन्या गजानन चौगुले, मनोज उर्फ मन्या तुकाराम पाटील, कारेकर कृष्णात जाधव आणि गिरीगांव येथील एका व्यक्तीचा या कारवाईत समावेश आहे. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

पोलिसांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी चौघांवर हद्दपारीचे आदेश जारी केले असून, नागरिकांना अशा गुन्हेगारी कारवायांची माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सामाजिक शांततेला धोका ठरणाऱ्यांवर कारवाई; चौघांवर हद्दपारी आदेश
Total Views: 23