बातम्या
विठ्ठल नामाची शाळा भरली.. शाळा शिकताना तहान भूक हरली
By nisha patil - 7/26/2026 11:31:34 PM
Share This News:
**विठ्ठल नामाची शाळा भरली.. शाळा शिकताना तहान भूक हरली.*
*आजऱ्यातील गांधीनगर येथे श्रीविठ्ठल रिक्मिणीची भव्य महापूजा*
श्रीसंत सेना महाराज मंदिरात संपन्न झाला सोहळा*
**आजरा(हसन तकीलदार*:-आषाढी एकादशीचे औचित्य साधून गांधीनगर आजरा येथील श्रीसंतसेना महाराज श्रीविठ्ठल रुक्मिणीची भव्य महापूजा उत्साहात साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. वैष्णवासाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. गांधीनगर आजरा येथेही मोठ्या उत्साहात श्रीविठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. नाभिक समाजाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नाभिक समाजातील भाविक श्रीकांत पारपोलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने आणि भक्तीमय वातावरणात पूजा संपन्न झाली. आषाढी एकादशीनिमित्त श्रीसंत सेना महाराज मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल नामाचा गजर सुरु होता. विठूमाऊलीच्या मूर्तीला अभिषेक घालून आकर्षक व मनमोहक फुलांचा आरास करण्यात आला होता त्यामुळे वातावरणात एक भक्तीमय चैतन्य दिसून येत होते. पूजेनंतर उपस्थित भक्तगणांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर जय हरी विठ्ठल आणि विठू माऊलीच्या जयघोषाने प्रफुल्लित झाले होते.
यावेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष आकाश नंदकुमार शिंदे, निखिल पाचवडेकर, सतीश शिंदे, निखिल काशीद, अशोक पाचवडेकर, बाळासाहेब पाचवडेकर, कृष्णा यादव(चीफ लाईफ इन्शुरन्स अडव्हायझर), गौतम भोसले, निलेश साळुंखे, प्रकाश यादव, रामचंद्र पाचवडेकर, दत्तात्रय पोवार, आनंदा इंगळे, संजय पाचवडेकर, चंद्रकांत शिंदे, सागर पाचवडेकर, रामचंद्र शिंदे यांच्यासह गांधीनगर परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, पारपोलकर कुटुंबीय आणि विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठल नामाची शाळा भरली.. शाळा शिकताना तहान भूक हरली
|