बातम्या
हेरले येथे ८ वर्षीय बालकास भटक्या कुत्र्याचा चावा
By nisha patil - 7/8/2026 3:52:36 PM
Share This News:
हेरले येथे ८ वर्षीय बालकास भटक्या कुत्र्याचा चावा
तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके : हेरले गावातील तळ्याकडील गल्ली येथील हर्षवर्धन अमोल वडड(वय ८ वर्षे) या बालकास भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन हा आपल्या परिसरात असताना अचानक भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
गावात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेरले येथे ८ वर्षीय बालकास भटक्या कुत्र्याचा चावा
|