बातम्या

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

80th Independence Day Celebrated with Enthusiasm


By nisha patil - 8/15/2026 2:19:19 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
​       
कोल्हापूर, दि. १५:येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष आणि आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

​       
यावेळी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संचालिका सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, युवराज गवळी, ॲड. शाहू काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, व्यवस्थापक, उप व्यवस्थापक यांच्यासह मध्यवर्ती कार्यालय आणि कोल्हापूर शहरातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहणावेळी बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे, संचालिका सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी,  संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवराज गवळी, ॲड. शाहू काटकर, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आणि इतर मान्यवर दिसत आहेत.


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
Total Views: 14