बातम्या

शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न 

80th Independence Day celebration


By nisha patil - 8/16/2026 11:51:31 PM
Share This News:



शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते  ध्वजारोहण; संगीतमय कवायतीने उपस्थित भारावले                                  

कोल्हापूर  :  मुक्तसैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या आंतरभारती शिक्षण मंडळाच्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूल मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते ८o व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेचे माजी सचिव एम .एस. पाटोळे होते .

राष्ट्रीय छात्र सेनेचा लिडर जय कुंभार याने मानवंदना देऊन पाहुण्यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले . धजारोहणानंतर गीतमंच च्या विद्यार्थीनी,पर्यवेक्षिका सरिता शिंदे आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी समूहस्वरात राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे गायन केले . तीन कौमी नारे झाल्यानंतर मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी स्वागत व प्रास्ताविक करतानाच स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकास कर्तव्य आणि जबाबदारीचे भान असले पाहिजे याची जाणिव करून दिली . क्रीडाशिक्षक समीर जमादार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .

मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांचा सत्कार केला . पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी उपस्थित अन्य मान्यवरांचा सत्कार केला . शैक्षणिक वर्ष २००३ च्या बॅचमधील निलेश मनाडे आणि अन्य सहकाऱ्यांचा मुख्याध्यापकांनी यथोचित सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कृतज्ञता भेट म्हणून प्रोजेक्टर मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला . यावेळी एन.एम.एम.एस . आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा प्रमुख पाहुणे सुरेश शिपूरकर आणि माजी सचिव एम .एस. पाटोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . क्रीडा प्रशिक्षक तसेच जिमखाना प्रमुख राजेंद्र बनसोडे आणि समीर जमादार तसेच सागर वाडकर या शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली संगीतमय कवायतींचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले . देशभक्तीपर विविध गीतांतून विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली . प्रमुख पाहुणे सुरेश शिपूरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतानाच एकतेचा आणि सन्मार्गाचा मूलमंत्र दिला तसेच प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. माजी सचिव एम.एस.पाटोळे यांनी शाळेच्या अलौकिक कामगिरीबद्दल मुख्याध्यापक आणि सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले सूत्रसंचालन शीतल कपिलेश्वरी यांनी तर रोहिणी येडगे यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी वाय. पी. पोवार विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिणगारे, स्वाती चव्हाण, वृषाली कुलकर्णी,मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक भिऊंगडे, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न 
Total Views: 15