बातम्या
मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत व्यंकटरावचा प्रतीक येसणे राज्यात तृतीय*
By nisha patil - 8/24/2026 11:28:46 AM
Share This News:
* *मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत व्यंकटरावचा प्रतीक येसणे राज्यात तृतीय*
**आजरा(हसन तकीलदार )*:-. येथील व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सहभाग घेऊन उज्वल सुयश संपादन केले.
मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ,वाई, सातारा यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विचार करायला प्रवृत्त करणे, स्पर्धा परीक्षांना आवश्यक विचारसरणीला खतपाणी घालणे तसेच विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश वाचनाकरिता प्रोत्साहन मिळणे या उद्देशाने ही ज्ञानवर्धन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील इयत्ता नववी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शहरी शाळांतून
राज्यस्तर, जिल्हा स्तर व तालुकास्तर अशा तिन्ही स्तरावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत
शहरी राज्यस्तर तृतीय क्रमांक
कु. प्रतीक रमेश येसणे या विद्यार्थ्यांने यश संपादन केले. या विजेत्या स्पर्धकाला मुंबई येथे संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नाम. डॉ. उदय सामंत यांचे हस्ते रोख रक्कम १०,००० रु. सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी शाळेतील इयत्ता नवावीचे एकूण २२ विद्यार्थी बसले होते . सदर परीक्षा ही आॕनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे . यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस.के.कुंभार यांचे लाभले. विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ, आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे माजी प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर , प्राचार्य एस. एन.पाटील, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शहरातून व पालक वर्गातून कौतुक होत आहे.
मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत व्यंकटरावचा प्रतीक येसणे राज्यात तृतीय*
|