बातम्या

उत्तूर एस. टी. स्टॅंडच्या पूर्णत्वासाठी नाम मुश्रीफ यांना दिले निवेदन*

99


By nisha patil - 8/24/2026 11:34:08 AM
Share This News:



**उत्तूर एस. टी. स्टॅंडच्या पूर्णत्वासाठी नाम मुश्रीफ यांना दिले निवेदन*

**नाम. मुश्रीफ यांनी बांधकाम सुरु करण्याचे दिले आश्वासन*

**आजरा(हसन तकीलदार)*:-मागील 18 ऑगस्ट पासून उत्तूरच्या एस.टी.स्टॅन्डचे एक वर्षापासून बंद पडलेले बांधकाम सुरु करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेतर्फे धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु केले आहे. शनिवारी नाम. मुश्रीफ हे एका कार्यक्रमासाठी उत्तूर येथे आले असताना प्रवासी संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नाम. मुश्रीफ यांची भेट घेऊन गेल्या वर्षभरापासून उत्तूर एस. टी. स्टॅंडचे जे बांधकाम बंद आहे

आणि त्यामुळे लाखो रुपयांचे साहित्य बेकार होत आहे ते बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी निवेदन देण्यात आले.

      यावेळी नाम. हसन मुश्रीफ म्हणाले की, उत्तूरच्या एस. टी.स्टॅंडचे बांधकाम का थांबले आहे या खोलात मी जाणार नाही परंतु शिवाजी गुरव यांनी सामाजिक प्रश्न घेऊन उत्तूरच्या एस. टी. स्टॅंडसाठी केलेले आंदोलन हे खरोखरच कौतुकास्पद आहे. निधी परत गेला की काय झाले याची चौकशी करून निधी परत गेला असेल तरी पुन्हा उपलब्ध केला जाईल आणि उत्तूरच्या एस. टी. स्टॅंडचे काम पूर्ण केले जाईल. असे आश्वासन त्यांनी दिले.

     कॉ. शिवाजी गुरव म्हणाले की, मागील 18 ऑगस्ट पासून आंदोलन सुरु आहे. पाहिले तीन दिवस झाले तरी प्रशासनाला जाग येईना म्हणून तिसऱ्या दिवशी तीनवीचा कार्यक्रम केला. तरी प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणून पाचव्या दिवशी उत्तूरच्या एस. टी. कंट्रोल केबिनला टाळे ठोकण्याचा इशारा दिला तेव्हा आजऱ्याचे पोलीस निरीक्षक सरवदे साहेबांनी सकारात्मक व योग्य भूमिका घेत सोमवारी तहसीलदार, गट विकास अधिकारी व एस. टी. चे अधिकारी यांच्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रवासी संघटना, ग्राहक पंचायत समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. दरम्यान नाम. हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यांनीही काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. जर सोमवारच्या बैठकीत योग्य तोडगा किंवा निर्णय झाला नाही व काम सुरु झाले नाही तर प्रवासी संघटना रस्त्यावरची लढाई लढणार याला सर्वस्वी एस. टी. महामंडळ जबाबदार राहील असे गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

    यावेळी रामदास मोरवाडकर, शिवाजी इंगळे, सुभाष कांबळे, महादेव सुतार, निवृत्ती गजरकर, रोहिणी चौगुले यांच्यासह प्रवासी संघटनेचे व ग्राहक पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उत्तूर एस. टी. स्टॅंडच्या पूर्णत्वासाठी नाम मुश्रीफ यांना दिले निवेदन*
Total Views: 138