बातम्या

*गोकुळच्या भविष्यासाठी आजरा तालुक्यात संवादाची गंगा

A Stream of Dialogue


By nisha patil - 8/26/2026 11:42:30 PM
Share This News:



*गोकुळच्या भविष्यासाठी आजरा तालुक्यात संवादाची गंगा

*आम. सतेज पाटील यांचा झंजावती दौरा

*आजरा(हसन तकीलदार)*:-गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज उर्फ बंटी  पाटील यांच्या उपस्थितीत आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, मुमेवाडी, उत्तूर, आर्दाळ, मडिलगे, देवकांडगाव, कोरीवडे, पेरणोली, किणे व कोळिंद्रे या गावांमध्ये ठरावधारक, दूध उत्पादक व प्रमुख मंडळींशी संवाद साधण्यात आला.

आजरा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर आजरा गोकुळ दूध संघ, आजरा अर्बन बँक व जनता बँक सभागृहात बैठका घेण्यात आल्या. जनता बँक सभागृहातील बैठकीत गोकुळच्या मागील पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आगामी वाटचालीबाबत विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी मुकुंददादा देसाई यांनी गोकुळच्या मागील पाच वर्षांच्या कामाचा आढावा मांडला. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दूध उत्पादकांच्या हितासाठी केलेल्या कामांची माहिती देत गोकुळचा कारभार स्थानिक दूध उत्पादक व ठरावधारकांच्या हिताचा राहण्याची गरज व्यक्त केली. मागील पाच वर्षांत दूध उत्पादकांना दिलेल्या दरवाढीपासून ते सोलर प्रकल्पापर्यंत विविध कामांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

बैठकीस अंजनाताई रेडेकर, अभिजीत तायशेटे, रणजितसिंह पाटील, विद्याधर गुरबे, राहुल देसाई, शामराव देसाई, सत्यजित जाधव, सचिन घोरपडे, ज्ञानेश शशिकांत पाटील चुयेकर, सुनिल शिंत्रे, मुकुंददादा देसाई, सुधीर भाऊ देसाई, महादेव हेब्बाळकर, एम. के. देसाई, अल्बर्ट डिसोझा, जनार्दन बामणे, राजू मुरकुटे, विजय पाटील, सिद्धेश नाईक, अनिकेत चराटी, गोविंद गुरव, प्रकाश कविटकर, दशरथ अमृते यांच्यासह प्रमुख मंडळी व ठरावधारक उपस्थित होते.
तसेच संजय शेणगावे, जम्बोअण्णा गोरुले, सचिन परीट, विजय गुरव, बबनराव पाटील, विश्वनाथ करंबळी, सचिन उत्तूरकर, विजय सावेकर, बाळासाहेब पाटील, मारुती घोरपडे, स्वागत परुळेकर, अनिल जांभळे, संग्रामराजे घोडके, अजित उत्तूरकर, शौनकराज देसाई, संभाजी तांबेकर, अमोल बांबरे, सचिन पावले, तानाजी गुरव, जयवंत सुतार, एम. एस. पाटील, रमेश बुगडे, दिपाली पाटील, गोविंद नारळकर यांच्यासह विविध गावांतील प्रमुख मंडळींची उपस्थिती होती.

बैठकीच्या शेवटी राजू होलम यांनी आभार मानत गोकुळच्या हितासाठी व दूध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी आजरा तालुक्यातील ठरावधारक बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वासोबत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन आजरा गोकुळ टीम सतेजच्या माध्यमातून करण्यात आले. रवींद्र भाटले, प्रकाश पाटील, संदिप गुरव, मंगेश गुरव, दत्तात्रय यादव, प्रकाश मोरे, संजय कांदळकर, राजू चौगुले व प्रकाश माळी यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले.
 

दौरा यशस्वीरीत्या मार्गस्थ करण्यासाठी किरण पाटील, विनायक पाटील, सुधीर पाटील, विजय पोवार, सुमीत सावंत, बाळासाहेब पाटील, विक्रम देसाई व नौशादभाई बुडेखान यांनी टीम सतेजच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केले.

गावोगावी संवाद, ठरावधारकांशी थेट संपर्क,गोकुळच्या भविष्यासाठी विचारमंथन यामुळे बंटी पाटील यांच्या नेतृत्वाला आजरा तालुक्यातून भक्कम साथ मिळत असल्याचे सांगण्यात आले.


*गोकुळच्या भविष्यासाठी आजरा तालुक्यात संवादाची गंगा
Total Views: 42