बातम्या
मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ; 324 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
By nisha patil - 7/23/2026 6:35:56 PM
Share This News:
मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ; 324 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर, दि. २३ : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर "सेवा यज्ञाचा संकल्प – रक्तदान" अभियान राबविण्यात आले. "रक्तात राष्ट्रभक्ती, रक्तदानातून शुभेच्छा" या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कोल्हापूरमध्येही नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये दिवसभरात 324 रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार अमल महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महापौर रुपारानी निकम, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, विराज चिखलीकर भाजपा नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती होती.
कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच या रक्तदान शिबिराला कोल्हापूरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सामाजिक सेवेचा संदेश अधिक बळकट झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न ; 324 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
|