बातम्या

*देवर्डे ता आजरा येथे ४ सप्टेंबरला रंगणार भक्ती-ज्ञानाचा जागर; वारकरी सांस्कृतिक परंपरेचा होणार जागर

A celebration of devotion and knowledge to be held at Devarde


By nisha patil - 2/9/2026 12:11:57 PM
Share This News:



*संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

*देवर्डे ता आजरा येथे ४ सप्टेंबरला रंगणार भक्ती-ज्ञानाचा जागर; वारकरी सांस्कृतिक परंपरेचा होणार जागर

*आजरा (हसन तकीलदार):- संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पुणे महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
     

याच उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री विठ्ठल मंदिर, देवर्डे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा, वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी रसिकांना अनुभवता येणार आहे. भक्तिगीते, अभंग, कीर्तन, वारकरी परंपरा तसेच संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा जागर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
 

देवर्डे व परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


*देवर्डे ता आजरा येथे ४ सप्टेंबरला रंगणार भक्ती-ज्ञानाचा जागर; वारकरी सांस्कृतिक परंपरेचा होणार जागर
Total Views: 22