शैक्षणिक
निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधात योगदान देणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
By nisha patil - 4/5/2026 12:59:33 PM
Share This News:
निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधात योगदान देणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
आजरा(हसन तकीलदार) - श्री लक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, हसूर खुर्द, ता. कागल येथे कॉम्रेड संतराम पाटील सभागृहात निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष तसेच पश्चिम घाट वणवा प्रतिबंध समितीचे प्रमुख कार्यकर्ते जी.एम.पाटील (इंजिनिअर,आजरा )उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करताना निसर्ग संवर्धनाची गरज अधोरेखित केली आणि प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
टी.एस. गडकरी संचालक, महाराष्ट्र शिक्षण मंडळ ,कोल्हापूर यांनी प्रमुख पाहुणे व तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा अल्प परिचय करून दिला तसेच या कार्यक्रमाच्या संयोजनाचा हेतू, त्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली.
प्रमुख उपस्थितीमध्ये हरीश आनंदा पाटील (माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त लष्करी जवान), सुभाष गडकरी (विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत हसूर खुर्द),पुरुषोत्तम साळोखे (उपसरपंच, ग्रामपंचायत हसूर बुद्रुक), टी. एस.गडकरी (ज्येष्ठ संचालक, महाराष्ट्र शिक्षण मंडळ, कोल्हापूर),मोहन आनंदराव पाटील सर (सदस्य, कौन्सिल समिती, भारती विद्यापीठ, पुणे), रणजित कालेकर (दैनिक सकाळ, वृत्तप्रतिनिधी, आजरा ), बी. वाय. पाटील (माजी मुख्याध्यापक, आनंदराव पाटील प्रशाला, बेलेवाडी काळम्मा), पांडुरंग आरागडेसो (माजी पी.एस.आय.) तसेच चिमणे (आजरा) येथील माजी सरपंच यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली.
समारंभात वणवा प्रतिबंधासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच एन.एम. एम.एस.परीक्षेत तसेच शालेय वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते वह्या, पेन,कंपास तसेच पुष्प देऊन गौरव करण्यात आला.तसेच याप्रसंगी विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष,विद्यालयाचे मुख्याध्यापक ,बी डी.पाटील सर यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ,एस.आर.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.एस.सुतार यांनी मानले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचेल अशी अशा आहे.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी इ.5 वी ते 9 वी चे सर्व विद्यार्थी,पालक , प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
निसर्ग संवर्धन व वणवा प्रतिबंधात योगदान देणाऱ्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
|