बातम्या
ऋषिकेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त यादवनगरात मोफत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
By nisha patil - 11/9/2026 11:09:31 PM
Share This News:
ऋषिकेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त यादवनगरात मोफत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
यादवनगर / कोल्हापूर कागल प्रतिनिधी अजित बोडके सामाजिक बांधिलकी जपत ऋषिकेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
"रक्तदान... हेच श्रेष्ठ दान..." या संदेशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता यादवनगर, काळभैरव मंदिर शेजारी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने ५ लिटरचा थंड पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५० हून अधिक तरुणांनी व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला. जास्तीत जास्त नागरिकांनी व तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ऋषिकेश गायकवाड यांनी केले होते.
यावेळी परिसरातील मान्यवर व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऋषिकेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त यादवनगरात मोफत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
|