बातम्या
हत्तीणीच्या प्रश्नाला माणुसकीची जोड; माधुरीनंतर कृष्णराज महाडिक विमानाने कोल्हापूरकडे
By nisha patil - 11/9/2026 10:33:47 PM
Share This News:
हत्तीणीच्या प्रश्नाला माणुसकीची जोड; माधुरीनंतर कृष्णराज महाडिक विमानाने कोल्हापूरकडे
कोल्हापूर : वनतारा येथून माधुरी हत्तीण नांदणीच्या दिशेने रवाना झाल्यानंतर तिच्या पुढील प्रवासाची आणि व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि वनताराचे सीईओ विवान कराणी मुंबईहून विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
माधुरी हत्तीणीच्या विषयात केवळ राजकीय भूमिका न घेता तिच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या पुढील व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करत कृष्णराज महाडिक यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे. संवेदनशील विषयावर सातत्याने लक्ष ठेवत प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यासाठी कोल्हापूरकडे धाव घेण्याची त्यांची तत्परता विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
माधुरीच्या सुरक्षिततेसाठी आणि तिच्या हितासाठी महाडिक यांनी दाखवलेली संवेदनशीलता व जबाबदारीची भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची सकारात्मक बाजू अधोरेखित करणारी ठरत आहे. वनतारा प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधून पुढील कार्यवाहीबाबत ते काय भूमिका घेतात, याकडे आता कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.
हत्तीणीच्या प्रश्नाला माणुसकीची जोड; माधुरीनंतर कृष्णराज महाडिक विमानाने कोल्हापूरकडे
|