विशेष बातम्या

स्वदेश संस्थेचे उपसंचालक तुषार इनामदार यांच्याकडून पन्हाळगडाच्या सर्व नगरसेवक,नगराध्यक्षानां पत्र

A letter from Tushar Inamdar Deputy Director of Swadesh organization to all the corporators and the mayor of Panhalgad


By nisha patil - 2/2/2026 11:22:07 AM
Share This News:



स्वदेश संस्थेचे उपसंचालक तुषार इनामदार यांच्याकडून  पन्हाळगडाच्या सर्व नगरसेवक,नगराध्यक्षानां पत्र 

पन्हाळा प्रतिनिधी( शहाबाज मुजावर) :-  तुषार इनामदार हे पन्हाळा गडाचे नागरिक आहेत.ते सध्या ते मुंबईत राहतात. त्यांनी आपल्या जन्मभूमी च्या विकासासाठी प्रत्येक नगरसेवकाला पत्र पाठवले आहे. त्याची गावात चांगलीच चर्चा आहे.त्या पत्रात त्यांनी पहिल्यांदा सर्व नगरसेवकांच्या निवडीबद्दल अभिनंदन केली आहे.त्यांनी त्यांच्या पत्रात शहरविकासासाठी  प्राधान्यक्रमाबाबत सूचना दिले आहे.
           ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या पन्हाळा शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आता प्रत्येक पन्हाळगडाच्या नगरसेवकावर आहे. ही अभिमानाची तसेच जबाबदारीची बाब आहे.असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत लोककल्याण हेच राज्यकारभाराचे केंद्रबिंदू होते, तर महात्मा गांधीजींनी स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा कणा मानला. या विचारांना अनुसरून पन्हाळा नगरपरिषदेच्या कार्यकाळात खालील बाबींना प्राधान्यक्रमाने हाताळावे, अशी विनंती  तुषार इनामदार यांनी केली आहे. त्यामध्ये खालील प्रमाणे त्यांनी मागण्या प्रत्येक नगरसेवक, नगराध्यक्षा यांच्याकडे केले आहेत.

           २४ तास पाणीपुरवठा योजना,भुयारी वीजवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे,सर्व स्ट्रीट लाईट्स व नगरपरिषद कार्यालय सौरऊर्जेवर चालवणे,पंतप्रधान सूर्यघर योजना प्रभावी अंमलबजावणी,पर्यटन मार्गदर्शकांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण ,युनेस्को जागतिक वारसा स्थळाबाबत दर तिमाही आढावा बैठक,स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य,सर्व शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधावा. तसेच कोल्हापूर-पन्हाळा एस.टी. बस सेवा सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
आरोग्यमंत्र्यांच्या समन्वयाने पन्हाळा रुग्णालयाचे आधुनिकीकरण,दर तिमाही प्रभागसभा व ४८ तासांत तक्रार निवारण
नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा नगरपरिषद अधिक सक्षम, स्वच्छ व नागरिकाभिमुख विकास करावा असे सुचवले आहे.
      नगरपरिषद वर गेली नऊ वर्ष   प्रशासन असल्यामुळे प्रत्येक नागरिकांचे  नगरसेवकांकडे अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच या पत्रामुळे गावात विकासाची चर्चा सुरू आहे. यावर नगरसेवक, नगराध्यक्षा किती प्रयत्न करतात, याकडे सर्व गावाचे लक्ष लागून आहे.


स्वदेश संस्थेचे उपसंचालक तुषार इनामदार यांच्याकडून पन्हाळगडाच्या सर्व नगरसेवक,नगराध्यक्षानां पत्र
Total Views: 136