बातम्या
आज आजऱ्यात दूध उत्पादक शेतकरी सभासदांची बैठक संपन्न
By nisha patil - 7/31/2026 7:34:36 PM
Share This News:
दूध उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी चळवळ उभा करण्याचा निर्धार
आज आजऱ्यात दूध उत्पादक शेतकरी सभासदांची बैठक संपन्न
*आजरा(हसन तकीलदार)-: दूध उत्पादक सभासदांना येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत थेट मताचा अधिकार मिळाला पाहिजे याबरोबरच गोकुळच्या एकूण कारभारावर सभासदांचा दबाव तयार झाला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये ५०० कोटीच्या वर होणाऱ्या खर्चावर आळा घातला पाहिजेत यासाठी चळवळ उभा करण्याचा निर्धार आज आजरा येथे श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर झालेल्या दूध उत्पादक सभासदांच्या बैठकीत करण्यात आला. लवकरच दूध उत्पादक सभासदांचा व्यापक मेळावा घेऊन याबाबतची लढ्याची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
बैठकीत सुरुवातीला कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी या बैठकी मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,गोकुळच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा घोडेबाजार चालू आहे तो थांबला पाहिजेत आणि सभासदांना मताचा थेट अधिकार मिळाला पाहिजेत यासाठी काय करता येईल याचा विचार करण्यासाठी आजची बैठक आयोजित केली आहे.दूध उत्पादक राबून, जनवारांचे पोषण करून दूध उत्पादन वाढवतात. दूध संस्थांना संजीवनी देतात परंतु निवडणुकीत मात्र या दूध उत्पादकांना कोणताच अधिकार मिळत नाही की लाभ मिळत नाही.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजीराव देसाई यांनी काही तांत्रिक मुद्द्यांची स्पष्टता करत जोपर्यंत दूध उत्पादक गोकुळचा थेट सभासद होत नाही तोपर्यंत त्याला मताचा अधिकार मिळणार नाही म्हणूनच ही लढाई सरकार बरोबर करून दूध उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळवून देणारी आहे.त्यातूनच संचालक आणि प्रशासनावर दबाव तयार होईल त्यामुळे ही चळवळ आपण व्यापक स्तरावर नेणार आहोत.
यावेळी कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की,याची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना त्यांचा हक्क समजावून सांगून याला व्यापक रूप देण्यासाठी 10 ऑगस्ट 2026 रोजी ठीक सकाळी 11:00 वाजता मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत सभागृह आजरा येथे होणारा मेळावा यशस्वी करून आपण ही चळवळ व्यापक बनवूया.त्याची तयारी जोरदार करू या.असे आवाहन केले आहे.
यावेळी नामदेव फगरे, कॉ शांताराम पाटील,युवराज पोवार,शिवाजीराव इंगळे, प्रकाश मोरुस्कर, संजयराव देसाई, ज्ञानदेव गुरव, महादेव सुतार, हिंदुराव कांबळे, दिगंबर होरंबळे, प्रकाश दोरुगडे, संतोष शेटगे, देविदास शेटगे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
आज आजऱ्यात दूध उत्पादक शेतकरी सभासदांची बैठक संपन्न
|