बातम्या

आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न;

A meeting of the key officebearers of the Andolan


By nisha patil - 3/8/2026 1:08:05 PM
Share This News:



आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न;

रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी निधी संकलनाला गती
 

प्रतिनिधी : आचिन हेरवाडे आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज शेतकरी वजन काटा परिसरात पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
 

यावेळी रिकव्हरी प्रयोगशाळा (रिकव्हरी लॅब) उभारणीसाठी गावागावातून निधी संकलनाचे काम चालू महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सप्टेंबर महिन्यात प्रयोगशाळेची उभारणी करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.
 

बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, निधी संकलनासाठी संघटनेचे पदाधिकारी आपल्या गावात आल्यास त्यांना सर्व शेतकरी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरणार असल्याने सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न;
Total Views: 14