बातम्या
*दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमार विरोधात आजऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला
By nisha patil - 7/21/2026 3:36:27 PM
Share This News:
*दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमार विरोधात आजऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला
*आजरा(हसन तकीलदार):-दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर पेपर फुटी विरोधात व शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांचे संविधानिक पद्धतीने शांततेत सुरु असणाऱ्या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आजऱ्यातील संविधानप्रेमी व लोकशाहीवादीनी आजऱ्यातील शिवतीर्थावर एकत्र येत हुकूमशाही सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी घोषणानी परिसर दाणाणून सोडला.
सरकारच्या दडपशाही विरोधात सरकारच्या कृतीचा आणि पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध करीत मोर्चाने जाऊन याबाबतचे आजरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय संविधान व लोकशाहीप्रेमी उपस्थित होते.
*दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमार विरोधात आजऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला
|