बातम्या

जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!

A salute to the tribal culture that preserves the forest


By nisha patil - 10/8/2026 12:58:35 PM
Share This News:



जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!

आदिवासी असणे ही केवळ एक सामाजिक ओळख नाही; ती निसर्गाशी असलेल्या माणसाच्या हजारो वर्षांच्या नात्याची जिवंत साक्ष आहे.

नंदुरबारच्या सातपुड्याच्या कुशीत पिढ्यान्‌पिढ्या जगणाऱ्या आदिवासी समाजाने जंगलाला केवळ संपत्ती मानले नाही, तर त्याला जीवन मानले; जमिनीला मालमत्ता नव्हे, तर माता मानले आणि निसर्गाशी संघर्ष करण्याऐवजी त्याच्याशी सहजीवनाचा मार्ग स्वीकारला.

काळ बदलला, व्यवस्था बदलल्या, विकासाच्या व्याख्याही बदलल्या; पण या समाजाने आपली बोली, लोककला, परंपरा, श्रमसंस्कृती, सामूहिकता आणि निसर्गनिष्ठ जीवनमूल्यांची ज्योत आजही जपली आहे.

आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त केवळ शुभेच्छा देणे पुरेसे नाही. आदिवासी समाजाचा स्वाभिमान, त्यांचे हक्क, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या विकासाच्या आकांक्षा यांचा सन्मान करणे हीच या दिवसाची खरी संकल्पना आहे. या संकल्पनेला साकार करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. 

सातपुड्याच्या मातीचा स्वाभिमान जपणाऱ्या,
निसर्गाशी नाते जपणाऱ्या आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा अभिमानाने पुढे नेणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

हसन मुश्रीफ,
वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री, नंदुरबार


जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!
Total Views: 9