बातम्या
हे जीवन सुंदर आहे वर शहाजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न
By nisha patil - 8/31/2026 8:49:17 PM
Share This News:
हे जीवन सुंदर आहे वर शहाजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न
कोल्हापूर : हे जीवन सुंदर आहे या विषयावर समुपदेशक डॉ. माधवी सावंत यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. बलुगडे यांनी स्वागत प्रास्ताविक करून व्याख्यानाचा हेतू विशद केला.
डॉ.माधवी सावंत यांनी आवाहन केले की तरुणांनी , विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम चा कमीत कमी वापर करून आपले जीवन सुंदर करावे. आपल्या ध्येयावर आणि चांगल्या लोकांना आदर्श म्हणून तशी वाटचाल करावी. तरच हे जीवन सुंदर आणि टिकाऊ राहील. आपले आई-वडील हे आपल्या हितासाठीच काही गोष्टी सांगत असतात. त्यांच्या विचारानुसार वागावे.
प्राचार्य डॉ शानेदिवाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी हट्टीपणा, अहंकार मीपणा कमी करून मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचावीत. महात्मा गांधी यांच्यासारख्या व्यक्तींचे विचार आचरनात आणावेत.
सूत्रसंचालन प्रा. पी पी भाटे यांनी केले. आभार डॉ डी. के वळवी यांनी मांनले.
सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानसशास्त्र विभागाच्या स्पंदन या भिंती पत्रकाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
हे जीवन सुंदर आहे वर शहाजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान संपन्न
|