बातम्या

तरुण मन समजून घेऊया यावर शहाजी मध्ये विशेष व्याख्यान संपन्न 

A special lecture on Understanding the Young Mind


By nisha patil - 7/18/2026 10:21:03 PM
Share This News:



तरुण मन समजून घेऊया यावर शहाजी मध्ये विशेष व्याख्यान संपन्न 

कोल्हापूर :श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "तरुण मन समजून घेऊया" या विषयावर आधारित विशेष व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभागप्रमुख, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. 
   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. बी. बलुगडे यांनी केले.प्रमुख अतिथी डॉ. शिरीष शितोळे  यांनी आजची तरुणाई आणि वर्तमान वास्तव तसेच त्याअनुषंगाने होत चाललेले बदल यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. याशिवाय आपला हॅपिनेस फॉर्म्युला कसा अधिकाधिक विकसित करता येईल याअनुषंगाने मार्गदर्शन केले.
    .

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी आजचा तरुण आणि वर्तमान घडणाऱ्या घटना आणि प्रसंगावर प्रामुख्याने कटाक्ष टाकला.
   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 
   

या कार्यक्रमासाठी डॉ. के. एम. देसाई (स्टाफ सेक्रेटरी) डॉ. डी. के. वळवी (मराठी विभागप्रमुख) तसेच रवींद्र भोसले (प्रबंधक) मनिष भोसले (अधीक्षक) उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार डॉ. डी. के. वळवी यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. पी. पी. भाटे यांनी केले.


तरुण मन समजून घेऊया यावर शहाजी मध्ये विशेष व्याख्यान संपन्न 
Total Views: 9