बातम्या

मेहनत, जिद्द आत्मविश्वासाची कमाल; सूर्यप्रतापसिंहने पटकावले रौप्यपदक

A triumph of hard work


By nisha patil - 9/9/2026 3:31:09 PM
Share This News:



मेहनत, जिद्द आत्मविश्वासाची कमाल; सूर्यप्रतापसिंहने पटकावले रौप्यपदक
 

पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर आर.आर. खडके अकॅडमी, बोरपाडळे येथील आठवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सूर्यप्रतापसिंह उर्फ राणा संग्रामसिंह भोसले याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. शोटोकान कराटे-डू असोसिएशनच्या वतीने आयोजित १२ व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये त्याने विविध प्रतिस्पर्ध्यांना तगडी लढत देत आपल्या खेळातील कौशल्य सिद्ध केले.
         

लहान वयातच राज्यस्तरावरील स्पर्धेत पदक मिळविण्याची कामगिरी ही सूर्यप्रतापसिंहच्या मेहनतीचे आणि नियमित सरावाचे फलित मानली जात आहे. कराटेतील तंत्र, वेग आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली.
           

या स्पर्धेत आर.आर. खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकूण दोन रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीमुळे अकॅडमीतील विद्यार्थी, प्रशिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सूर्यप्रतापसिंहचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक व मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


मेहनत, जिद्द आत्मविश्वासाची कमाल; सूर्यप्रतापसिंहने पटकावले रौप्यपदक
Total Views: 32