बातम्या

चंदगड विधानसभा(आजरा, चंदगड, गडहिंग्लज )मतदारसंघासाठी मिळणार तब्बल ४५ नवीन बसेस!

A whopping 45 new buses to be allocated for the Chandgad Assembly constituency


By nisha patil - 3/8/2026 9:57:15 PM
Share This News:



चंदगड विधानसभा(आजरा, चंदगड, गडहिंग्लज )मतदारसंघासाठी मिळणार तब्बल ४५ नवीन बसेस!

आमदार शिवाजीराव पाटील l यांच्या धडाकेबाज पाठपुराव्याला मोठे यश!
 

आजरा(हसन तकीलदार ) चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार  शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने व प्रभावीपणे केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आजरा,चंदगड व गडहिंग्लज या तीनही एस.टी. बस डेपोच्या बळकटीकरणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
         

या निर्णयानुसार आजरा,चंदगड, गडहिंग्लज बस डेपोला प्रत्येकी १० नवीन साध्या एस.टी. बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय 'राजमाता जिजाऊ बस' योजनेअंतर्गत प्रत्येक डेपोसाठी प्रत्येकी ५ आधुनिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 

यामुळे या तीनही तालुक्यांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून एस टी वाहनांची कमतरता, फेऱ्यांमध्ये होणारा विलंब आणि जुन्या बसेसमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
 

चंदगड विधानसभा मतदारसंघातील आजरा, चंदगड व गडहिंग्लज नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार परिवहन सेवा मिळावी, यासाठी आमदार शिवाजीराव पाटील सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असून त्यातून एकामागून एक विकासकामांना गती मिळत आहे. हा निर्णय देखील त्याच प्रयत्नांचे फलित आहे.
 

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांचे आभार मानले. आणि आपली प्रतिक्रिया देताना जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार म्हणाले की, आमदार शिवाजीराव पाटील यांनी आजरा, चंदगड,गडहिंग्लज तालुक्याची गरज ओळखून प्रत्येक तालुक्याकरता 15 एसटी  बसेस मंजूर केल्यामुळे जनतेमध्ये भाऊंचे विषयी अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार शिवाजीराव पाटील तळागाळातील सर्व घटकांचा व विभागांचा विचार करून आपले विकास कार्य चालू ठेवले आहे.
 
   आमदार शिवाजीराव पाटील निवडून आल्यापासून विकास कामांचा झंजावात निर्माण केला आहे. आजरा तालुक्याकरीता भाऊंनी जवळपास दहा ते पंधरा कोटीचा विकास निधी दिलेला आहे त्यामध्ये किणे येथे नाबार्ड योजनेतून दोन कोटी रुपयांचा पुल, मासेवाडी रस्ता एक कोटी, दाभिलवाडी रस्ता एक कोटी, वाटंगी किणे रस्त्यासाठी 70 लाख, तसेच शाळांच्या विकास कामाकरिता जवळपास तीन कोटी,विविध विकासकामा करीता असे मिळून दहा ते पंधरा कोटी रुपयांचा निधी आमदार साहेबांनी मंजूर करून दिलेला आहे.
 प्रस्तावित कामांमध्ये अनेक गावांमध्ये विविध विकासकामे होतीलच. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने खेतोबा मंदिर परिसर विकास, नींगुडगे तालुका आजरा येथील अमृतेश्वर मंदिर विकास, येथील गोठण देव परिसर विकास,मलिग्रे येथील चाळोबा देव परिसर विकास, सरोळी -ऐनापुर येथे नदीवर पूल, आजरा नेसरी बेळगाव रस्ता सुधारणा करणे करिता निधी देण्याचे नियोजन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केलेले आहे.येत्या काही दिवसांमध्ये हा निधी प्राप्त झाल्यानंतर या आजरा विभागाचा चेहरा मोहरा बदलेल यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आमदार शिवाजीराव पाटील हे जनतेच्या मनाती


चंदगड विधानसभा(आजरा, चंदगड, गडहिंग्लज )मतदारसंघासाठी मिळणार तब्बल ४५ नवीन बसेस!
Total Views: 9