बातम्या

आदमापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी ची स्थापना करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी

Aadmapur


By nisha patil - 8/19/2026 11:42:43 PM
Share This News:



**आदमापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी ची स्थापना करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी*

भुदरगड प्रांतधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*आजरा(हसन तकीलदार)*:-भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबाळूमामा देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रसिद्ध झाले असून त्यामुळे भविकांच्या भावनेला धक्का पोहचला आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी यासह अनेक मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेमार्फत प्रांताधिकारी भुदरगड यांना निवेदन देण्यात आले आहे.

    निवेदनात म्हटले आहे की,भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबाळूमामा देवस्थानमध्ये मोठया प्रमाणावर अर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. याबाबत वृत्तपत्रांतून ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे भाविकामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. भाविकांच्या भावनेला धक्का पोहचला आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेवून सखोल चौकशीसाठी एआयटीची स्थापना तत्काळ करावी आणि महिनाभरात चौकशी करून तो अहवाल जनतेसाठी प्रसिद्ध करावा.या प्रमुख मागणी सह आणखीन काही गोष्टीकडे आपले लक्ष वेधीत आहे.

गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या सर्व विश्वस्तांना तात्काळ अटक करावी व त्यांची ईडी किंवा तत्सम यंत्रणेमार्फत चौकशी करावी.लम्बे समितीचा अहवाल जनतेसमोर आणावा. देवस्थानच्या सध्याच्या पोटनियमात दुरूस्ती करून दर तीन वर्षातून विश्वस्तांची नव्याने नेमणूक करावी.देवस्थानचा प्रसाद आणि अन्नपदार्थ यांचा दर्जा योग्य प्रकारे ठेवण्याबाबत उपाययोजना करावी. एकदा विश्वस्त म्हणून काम केल्यानंतर पून्हा त्या व्यक्तीस विश्वस्त पदावर नेमु नये. देवस्थान परिसरात प्रदुषणाचा प्रश्नही गंभीर होताना दिसतो. त्याला जबाबदार असलेल्या गोष्टीवर तत्काळ निर्बंध घालावेत.

देवस्थानचे पावित्र्य लक्षात घेवून भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.अर्थिक गैरव्यवहारामुळे देवस्थानच्या एकूण प्रतिमेला धक्का बसला असून असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची प्रशासनाच्या स्तरावर काळजी घेण्यात यावी.देवस्थानचे लेखापरीक्षण दरवर्षी नियमित करून जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावे, देवस्थान परिसरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

      निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्रकाश पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, जयसिंग टिकले, कृष्णा डाकरे,अविनाश शिंदे, सौ. मेरी डिसोझा, अवधूत पाटील, सौ. विमल पाटील, जयवंत वायदंडे, नवनाथ पाटील, रवींद्र पाटील, दिनेश कुंभीरकर, अशोक पाटील, अशोक दाभोळे, वसंत कांबळे, अशोक पाटील, बचाराम गुरव, अरुण खामकर, बापुसो किल्लेदार, उत्तम शेटके, थॉमस डिसोझा, संतोष कोटकर, वरद पाटील, सात्ताप्पा चव्हाण, सागर पाटील, अजित मोडेकर, मारुती पुरीबुवा, दीपक तेली यांच्या सह्या आहेत. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आदमापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी ची स्थापना करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी
Total Views: 79