बातम्या
आनंदवन कॉलनीत सामूहिक श्रमदानातून बनली गटर.
By nisha patil - 5/27/2026 10:26:39 PM
Share This News:
*आनंदवन कॉलनीत सामूहिक श्रमदानातून बनली गटर.*
**आजरा(हसन तकीलदार)**:-आनंदवन कॉलनीतील पाणी निचरा समस्येवर तात्काळ कार्यवाही करीत गटर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजरा येथील आनंदवन कॉलनी परिसरातील रहिवाशांनी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून तळी निर्माण होणे तसेच रहदारीमुळे चिखल होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची मागणी स्थानिक नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांच्याकडे केली होती.
या मागणीची तात्काळ दखल घेत नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रवीण बैले,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे तसेच स्थानिक रहिवासी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली.यावेळी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या.मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवावा लागेल मग फंड उपलब्ध करावा लागेल तोपर्यंत पाऊस आला तर हे काम होणार नाही त्यामुळे कॉलनीतील नागरिकांचे हाल होणार त्यामुळे सर्व रहिवासी एकत्र येऊन हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.पावसाळ्यात परिसरातील पाण्याचा योग्य निचरा व्हावा या दृष्टीने कच्च्या गटारी तयार करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला.
निर्णयानुसार तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली. रहिवाशांनी मागणी केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत कार्यवाही करून काम सुरू करण्यात आल्यामुळे आनंदवन कॉलनीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गटार काम सुरू असताना नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी), अध्यक्ष शिवाजी देसाई, उपाध्यक्ष मुसाभाई दरवाजकर, दयानंद भंडारी सर तसेच सुतार साहेब उपस्थित होते.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.आनंदवन कॉलनीच्या या सामूहिक प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
आनंदवन कॉलनीत सामूहिक श्रमदानातून बनली गटर.
|