बातम्या

"कोल्हापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव; शेंडूरच्या राजश्री खिरुगडे यांचा 'ट्रान्सफॉर्मेशन' पुरस्काराने सत्कार"

Accomplished woman from Kolhapur district honored


By nisha patil - 8/18/2026 8:14:43 PM
Share This News:



"कोल्हापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव; शेंडूरच्या राजश्री खिरुगडे यांचा 'ट्रान्सफॉर्मेशन' पुरस्काराने सत्कार"

 कागल प्रतिनिधी अजित बोडके कोल्हापूर / कागल - स्वप्न मोठं... जिद्द प्रचंड... ओळख स्वतःची! या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या कागल तालुक्यातील शेंदूर येथील सौ. राजश्री एकनाथ खिरुगडे यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित या विशेष 'ट्रान्सफॉर्मेशन' सत्कार समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले.

आशा गटप्रवर्तक म्हणून काम करत असताना प्रचंड कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रबळ इच्छा असलेल्या राजश्री मॅडम यांना स्किल इंडिया आणि महिला सक्षमीकरण अभियानाची साथ मिळाली. या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात 'आरोग्य मैत्रीण' म्हणून उल्लेखनीय काम केले असून, एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही त्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपला ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत Empower the Women - Rights, Responsibilities, Respect या संस्थेच्या वतीने आणि स्किल इंडिया अंतर्गत त्यांचा हा गौरव करण्यात आला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी "ग्रामीण भागातील महिलांसाठी राजश्री खिरुगडे यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. एका आशा वर्करपासून ते यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास इतर महिलांना नक्कीच ऊर्जा देणारा आहे," असे गौरवोद्गार काढले.

 


"कोल्हापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव; शेंडूरच्या राजश्री खिरुगडे यांचा 'ट्रान्सफॉर्मेशन' पुरस्काराने सत्कार"
Total Views: 14