बातम्या
कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. योगेश साळोखे
By nisha patil - 8/18/2026 8:22:03 PM
Share This News:
कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. योगेश साळोखे
कोल्हापूर : कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन, कोल्हापूरची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अॅड. योगेश साळोखे, तर उपाध्यक्षपदी अॅड. मीना पोवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदाची जबाबदारी अॅड. संजय मुळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत अॅड. विठ्ठल बांडेकर यांची जॉईंट सेक्रेटरी, तर अॅड. विधान शिंदे यांची लोकल ऑडिटर म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून अॅड. स्वाती नानवडे यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी अॅड. अक्षय जोशी, अॅड. साक्षी निकम, अॅड. सिद्धेश पोवार, अॅड. हेमा जाधव, अॅड. पुष्कर जाधव, अॅड. स्वप्नाली ठोकळे, अॅड. गोविंद शिंदे, अॅड. भाग्यश्री स्वामी, अॅड. आदित्य झुंजार पाटील, अॅड. अजित कावडे आणि अॅड. ऋषी कदम यांची निवड करण्यात आली आहे.
कौटुंबिक न्यायालयातील वकीलांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच पक्षकारांना अधिक प्रभावी कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवी कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. बार असोसिएशनच्या कामकाजात समन्वय, व्यावसायिक हितसंबंध आणि न्यायालयीन सुविधांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन, कोल्हापूरच्या नव्या कार्यकारिणीचे वकील वर्गातून अभिनंदन होत आहे.
कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. योगेश साळोखे
|