बातम्या

*शैक्षणिक गुणवत्तेत आजऱ्याच्या उर्दू हायस्कुलचा अप्रतिम ठसा

Ajaras Urdu High School Leaves an Outstanding Mark


By Shivani - 7/27/2026 4:59:08 PM
Share This News:



*शैक्षणिक गुणवत्तेत आजऱ्याच्या उर्दू हायस्कुलचा अप्रतिम ठसा

*शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूलचे घवघवीत यश*

*आजरा(हसन तकीलदार): -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक (इयत्ता ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत दि. अंजुमन इत्तेहादुल इस्लाम एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू  हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा  या शाळेने  आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
   

या परीक्षेस शाळेचे एकूण 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
 गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी 

 

प्रथम क्रमांक :-युसरा याह्याखन बुडडेखान– 240 गुण
 

द्वितीय क्रमांक :-राहत अनिस नाईकवाडे – 238 गुण,

तिसरा क्रमांक :-अमिरा अफझल तकीलदार _192 गुण, चौथा क्रमांक :-असिया अबुतल्हा नाईकवाडे – 190 गुण,
व अन्सार इर्शाद वाडीकर– 190 गुण,पाचवा क्रमांक :-रीहा रियाज अडकुरे– 170  गुण,व सादिया इरफान माणगावकर– 170 गुण,सहावा क्रमांक :-रीजा जुबेर भडगावकर– 138 गुण  अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहेत.या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.या यशामागे संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले असल्याचे सांगण्यात आले


*शैक्षणिक गुणवत्तेत आजऱ्याच्या उर्दू हायस्कुलचा अप्रतिम ठसा
Total Views: 885