बातम्या
शहाजी महाविद्यालयात अजितदादा यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 7/22/2026 4:25:32 PM
Share This News:
स्वर्गीय अजित दादांच्या पुरोगामी विचारांचा धागा जतन करूया :डॉ.आर.के.शानेदिवाण
शहाजी महाविद्यालयात अजितदादा यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वर्गीय अजित दादांना 67 व्या जयंती दिनानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.स्वर्गीय अजितदादांच्या पुरोगामी विचाराचा वारसा, धागा जतन करूया असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले. महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. श्री मनीष भोसले व डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा अजित पवार यांनी जतन केला. अनेक वेळा तो कृतीतून सिद्ध करून दाखवला. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत त्यांचा प्रवेश होता. समाजकारण, राजकारण, शिक्षण, सहकार, अर्थकारण यामध्ये त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले. बेधडक वृत्तीचे ते राजकारणातील दादा माणूस होत.
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शिवाजी रायजादे यांनी स्वागत केले. ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी आभार मानले .आय. क्यू. ए.सी.समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ. डॉ. के. एम. देसाई, अधीक्षक श्री मनीष भोसले, सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शहाजी महाविद्यालयात अजितदादा यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन
|