बातम्या
अजितदादांच्या जयंतीनिमित्य आजरा साखर कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रम*
By nisha patil - 7/22/2026 5:58:48 PM
Share This News:
**अजितदादांच्या जयंतीनिमित्य आजरा साखर कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रम*
**आजरा(हसन तकीलदार)*:-वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत कारखाना कार्यस्थळावर अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करणेत आला. कारखान्याने वेगवेगळ्या प्रजातीची 700 झाडे कारखाना परिसरात लावली असुन भविष्यात कारखान्यास उत्पन्न देणा-या बांबुची मोठया प्रमाणावर लागण करणेत आली आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके, बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर,उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, गोविंद पाटील, काशिनाथ तेली, हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के. सावंत, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
अजितदादांच्या जयंतीनिमित्य आजरा साखर कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रम*
|