बातम्या

केवळ विरोधासाठी विरोध नको -विकासाचे राजकारण करा - नगराध्यक्ष चराटी यांचा विरोधकांना सल्ला

Ajra Ashok charatti


By nisha patil - 11/4/2026 12:22:56 AM
Share This News:



**केवळ विरोधासाठी विरोध नको -विकासाचे राजकारण करा - नगराध्यक्ष चराटी यांचा विरोधकांना सल्ला*

**विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करून कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चराटी यांचा विरोधकांवर आरोप*

आजरा(हसन तकीलदार )**:-आजरा नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील द्वंद्व आता समोर येताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्यावर विरोधकांची होणाऱ्या टीकेला स्पष्टीकरण देण्यासाठी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी आपल्या नगरसेवकांसमवेत कै.काशिनाथअण्णा चराटी सभागृहात पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांच्यावर घणाघात करत प्रसिद्धीसाठी विरोधक ढोंग करित असल्याचा आरोप कोला.

   पुढे बोलताना अशोकअण्णा म्हणाले की, सद्या जी कामे सुरु आहेत ही कामे मागील काळातील पालकमंत्री आबिटकर यांनी दिलेली आहेत. मात्र विरोधी नगरसेवक ही कामे जणू आपणच मंजूर करून आणल्याच्या अविर्भावात नारळ फोडण्याचे काम करीत आहेत. शहरवासियांची दिशाभूल करीत केवळ प्रसिद्धीसाठी ढोंग करीत असल्याचा आरोप अशोकअण्णांनी केला.विरोधक अशा पद्धतीने काम करीत आहेत की जणू आपणच सर्व कामे करीत आहोत.रविवार धरून मंत्र्यांकडे जायचे निवेदन देऊन फोटो काढायचे आणि प्रसिद्धी माध्यमाना द्यायचं. एवढेच काम करीत आहेत.कचरा टेंडर काढताना हे सगळे एकत्र होते. टेंडर काढले हे त्यांना माहित होते.दुसऱ्या दिवशी काम सुरु होणार ही कल्पना असताना लगेच माध्यमांना माहिती दिली की आम्ही कचरा आणून नगरपंचायतीत टाकणार, विरोध करणारे विरोध करतील पण गावात भांडण तंटा नको, सर्वांनी गुण्या गोविंदाने राहून आजऱ्याचा विकास साधुया म्हणून त्यांच्या काही प्रश्नांना बगल देत विरोध केला. सामाजिक तेढ निर्माण करायचे नाही हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या पावसाळ्यापर्यंत अनेक गोष्टी करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. पाण्याचे नियोजन 80% पूर्ण झाले आहे.रस्त्यांची कामे इ. 75 % पर्यंत झालेली आहेत.25% राहिलेली कामे पुर्ण करीत आहोत. सगळ्यांनी मिळून शेवटी गावचा विकास करणे महत्वाचे आहे. भांडत बसण्यापेक्षा आपण विकास करूया. बंटी पाटील साहेबाकडून काही निधी मिळत असेल तर तेही आणा निधीसाठी प्रयत्न करा विरोधासाठी नको. गावचा नगराध्यक्ष मी आणि मला माहित नाही यांनी चार पाच ठिकाणी नारळ वाढवले. दर्गा गल्ली,वाणी गल्ली, नाईक गल्ली याठिकाणचे रस्ते आहेत. बांधकाम विभागाला सांगून रस्ते कसे करता येतील याचा प्रयत्न करूया.अधिकाऱ्यांना विरोधक आरेरावी करतात.राजीनामे मागतात. पालकमंत्री आबिटकर यांच्यामुळे नगपंचायतीला अधिकारी मिळालेले आहेत. विरोधकांच्या आरेरावीमुळे जर अधिकारी गेले तर पुन्हा अधिकारी मिळणे कठीण होऊन बसेल.अधिकाऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. नको त्या शब्दांचा प्रयोग योग्य नाही. सद्या सुरु असलेली विकासकामे मागील सभागृहाचीच आहेत. याचे सर्व श्रेय पालकमंत्री आबिटकर यांनाच जाते. आबिटकर साहेबाना निवेदन देऊन फोटो काढून प्रसिद्धी व श्रेय मिळवायचे ढोंग विरोधक करताहेत. आम्ही कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन प्रामाणिकपणे काम करीत आहोत. पाणी, रस्ते, कचरा या प्रश्नांची बऱ्यापैकी सोडणूक केली आहे.नामदार आबिटकर यांनी कचरा प्रक्रियाचे पाच वर्षाचे धोरण ठरवले आहे. सदर कंपनी कोणताही मोबदला न घेता पाच वर्षे कचरा प्रकल्प राबवून बायोगॅस आणि खत निर्मिती प्रकल्प सुरु करण्याच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मागील सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक समन्वयाने कामे केली. आताचे मात्र केवळ प्रसिद्धीसाठी नगरपंचायत आणि शहराला बदनाम करीत आहेत. भांडत बसण्यापेक्षा एकमेकांच्या समन्वयातून शहराचा विकास साधुया असे आवाहन अशोकअण्णांनी शेवटी केले. यावेळी सत्ताधारी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.


केवळ विरोधासाठी विरोध नको -विकासाचे राजकारण करा - नगराध्यक्ष चराटी यांचा विरोधकांना सल्ला
Total Views: 4