बातम्या
आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 26-27 करिता तोडणी वाहतूक करार सुरु
By Administrator - 3/20/2026 3:44:31 PM
Share This News:
आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 26-27 करिता तोडणी वाहतूक करार सुरु
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह साखर कारखान्याने गळीत हंगाम 2026 /2027 सुरु करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक असणारे तोडणी वाहतूक कंत्राटदारांचे करार करणेस आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात केली.
कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू करावयाचे झाल्यास कारखान्यास सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्याने मागील हंगामातील तोडणी वाहतूक यंत्रणेचा विचार करून येत्या हंगामात 4.50 लाख ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवून सदर ऊस गाळपासाठी आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणा भरणे जरूरी असलेने भारतीय नववर्ष व गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करणेस आज सुरुवात केली आहे
कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी याप्रसंगी सांगितले की,कारखान्याच्या पुढील काळात कारखाना लवकर सुरू करणेसाठी नियोजन करत आहोत. सद्य परिस्थितीत कारखान्यांनी कमी दिवसांत जास्त गाळप करणे काळाची गरज बनली आहे.तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील आपला ऊस लवकरात लवकर जावे अशी अपेक्षा असते त्यामुळे सक्षम यंत्रणा उभी करणे हे जरुरीचे आहे असे याप्रसंगी सांगितले.यावेळी कारखान्याचे साचालक रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत,मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, ऊस कंत्राटदार व कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 26-27 करिता तोडणी वाहतूक करार सुरु
|