बातम्या

आजरा महाविद्यालयात संपन्न झाले 'इंग्लिश विक' पारितोषिक वितरण*

Ajra college 1


By nisha patil - 8/26/2026 12:50:59 PM
Share This News:



**इंग्रजी भीतीदायक पण सध्या अत्यावश्यक-प्राचार्य डॉ. किरण पोतदार*

आजरा महाविद्यालयात संपन्न झाले 'इंग्लिश विक' पारितोषिक वितरण*

आजरा(हसन तकीलदार)**:-मराठी मुलामुलींसाठी इंग्रजी भाषा खरोखरच भीतीदायक आहे. पण आजच्या युगात त्याशिवाय पर्याय नाही. इंग्रजी भाषा आली तरच भविष्यात आपण टिकू शकतो. त्यामुळे या भाषेपासून दूर जाण्यापेक्षा त्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे अपरिहार्य असल्याचे आणि इंग्रजी विभागाने यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम संयुक्तिक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी केले.

          आजरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने 'इंग्लिश-विक' साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सहा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. दिलीप सकपाळ, अधीक्षक योगेश पाटील व पर्यवेक्षक मनोज पाटील प्रमुख उपस्थित होते.

 

आठवडाभराच्या या कार्यक्रमात वर्ड चेन, पॅरा रायटिंग, रीडिंग, स्पेल-बी, हॅण्ड रायटिंग, इंग्लिश साँग सिंगिंग अशा सहा स्पर्धा घेण्यात आल्याचे 

 

सहसमन्वयक डॉ. सलमा अत्तार यांनी प्रास्ताविकात सांगितले. समन्वयक प्रा. रमेश चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या सहभागाची सुरवातीला भिती होती, पण विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त आणि उदंड राहिल्याचे समाधान मिळाल्याचे सांगून दरवर्षी असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतला जाईल अशी ग्वाही दिली.

 

या विविध स्पर्धांमध्ये तन्वी येसादे, संचिता राणे, आयेशा किल्लेदार, प्रतीक्षा घुरे, रूमान माणगावकर, वैभवी कांबळे, वेदिका तेजम, तेजल कांबळे, अथर्व मोहिते, शिवम केसरकर, मानसी बुडके, अनुष्का आळवणे, सालेहा दरवाजकर, मसीरा नाईकवाडे, आदिती चव्हाण, धैर्यशील कावणेकर, सानिया मुजावर, अकमल लमतुरे, सृष्टी पाटील, समृद्धी गायकवाड, दीप्ती राऊत, समर्थ पांगम या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अथर्व मोहिते, मसीरा नाईकवाडे व मानसी बुडके यांची मनोगते झाली. यावेळी डॉ. रणजीत भादवणकर, विठ्ठल हाके, स्वाती देसाई, वैशाली देसाई, सुवर्णा धामणेकर, डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शेखर शिऊडकर यांनी आभार मानले


आजरा महाविद्यालयात संपत्र झाले 'इंग्लिश विक' पारितोषिक वितरण*
Total Views: 377